जेष्ठांनो थोडं थांबा नव्याना संधी द्या – अजित पवार

ajit pawar

पुणे: पक्षातील जेष्ठ नेत्यांनी आता थोडस थांबून पक्षासाठी काम करावं, तसेच नव्या दमाच्या लोकांना संधी द्या म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बदलाचे संकेत दिले आहेत. पुण्यामध्ये आयोजित पक्षीय बैठकीत ते बोलत होते.

पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादीची राज्यस्तरीय बैठकपार पडली. यामध्ये जेष्ठ नेते जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी नवीन नेतृत्वाला संधी देण्याची भावना व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदासाठी अजित पवार यांची शशिकांत शिंदेंच्या नावाला पसंती होती. मात्र शेवटी जयंत पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यामुळे बोलताना अजित पवार यांनी नवीन लोकांना पक्ष संघटनेत संधी द्या म्हणत खदखद व्यक्त केल्याचं दिसत आहे.

जयंत पाटील यांची ख्याती फिरकी गोलंदाज म्हणून आहे. ते मध्येच कधीकधी गुगली टाकतात, जस रोहित शर्माने कॅप्टन खेळी करून ipl मध्ये मुंबईला जिवंत ठेवलं तस आमच्या कॅप्टनने विधानसभेत आम्हाला विजय संपादन करून देण्यासाठी वाट्टेल ते करावं म्हणत अजित पवार यांनी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शुभेच्छा दिल्या.