औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा देवी मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या, आ. अंबादास दानवेंची पालकमंत्र्यांकडे मागणी!

ambadas danve

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत ४०० वर्षे जुन्या कर्णपुरा देवी मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

शहरात ४०० वर्ष जुने पुरातन आई तुळजाभवानीचे मंदिर छावणी परिसरातील कर्णपुरा येथे आहे. कर्णपुरा देवी तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मंदिराला ऐतिहासिक महत्त्व असून चारशे वर्ष जुनी परंपरा आहे. नवरात्रोत्सवात दहा दिवस या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. याकाळात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. नवरात्रीच्या काळात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे शहराच्या वैभवात भर घालणार्‍या या मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

छावणी परिसरातील कर्णपुरा देवी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शहराची ग्रामदेवता म्हणून कर्णिका माता देवीची ओळख आहे. नवरात्रोत्सवात या मंदिरात लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. राजस्थानातून आलेल्या कर्णसिंग राजाने या मंदिराची उभारणी केली. दानवे कुटुंबांची सातवी पिढी या मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहत आहे. राजस्थानचा बिकानेर येथील राजा कर्णसिंग १८३५ मध्ये शहरात वास्तव्यासाठी आले होते. छावणी परिसरातील कर्णपुरा येथे त्याचे वास्तव्य होते. राजा कर्णसिंग राजस्थान येथील कर्णिका मातेचे भक्त होते. या ठिकाणी देखील कर्णिका मातेचे मंदिर बांधायचे त्याने ठरवले. त्यानंतर या मंदिराची उभारणी करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या