‘कोरोनाविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व गडकरींकडे द्या’ भाजप खासदारानंतर नेटीजन्सच्या मागणीला जोर

nitin

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

कोरोना संसर्गामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. आरोग्य सुविधांची वाणवा असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान कार्यालय हे कोरोना स्थिती हातळण्यात अपयशी असून हे काम युद्धपातळीवर करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे द्यावे, असं भाजप खासदारानेच म्हटलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कोरोना प्रतिबंधातात्मक उपाययोजनांचं काम नितिन गडकरी यांच्याकडे सोपवावं अशी मागणी जोर धरू लागली आहे.

‘केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे खुपच नम्र असून त्यांच्या खात्याचं काम त्यांना मोकळेपणाने करू दिलं जात नाही. ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटिश साम्राज्यवाद्यानंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोना व्हायरसचा सामाना करून नक्कीच टिकू शकू. परंतु आपण आता ही परिस्थिती गंभीर्यांने घेतली नाही तर, आणखी एक कोरोना लाट येईल आणि लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करेन, त्यामुळे पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचे नाही. कोरोनाविरूद्धच्या युद्धाची जबाबदारी नितिन गडकरी यांच्याकडे सोपवावी तसेच कोरोना विरूद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वतःला सिद्ध केलं आहे.’ असं भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आता गडकरी हा शब्द ट्विटरवर ट्रेण्ड होत असून स्वामींनी सुचवलेला पर्याय अगदीच योग्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. लेखक आणि अभिनेत्या असणाऱ्या सुशील सेठ यांनीही गडकरींना या कामासाठी नियुक्त केले पाहिजे अशी मागणी करणारे ट्विट केले आहे.

महत्वाच्या बातम्या