शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळवून देण्याचे धैर्य आघाडी सरकारला दे, आमदार पवार यांचे साकडे

शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळवून देण्याचे धैर्य आघाडी सरकारला दे, आमदार पवार यांचे साकडे

Abhimanyu Pawar

उस्मानाबाद : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली असली तरी ती तोकडी असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याचे धैर्य आघाडी सरकारला दे, अशा प्रकारचे साकडे लातूरचे आमदार अभिमन्यू पवार यांनी तुळजापुरात तुळजा भवाणी चरणी घातले आहे.

या संदर्भात आमदार पवार यांची पदयात्रा काढत आपल्या मागणिचे निवेदनच तुळजापभवाणी चरणी अर्पण केले. या वेळी ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या व्यथेचा सार असलेले निवेदन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी अर्पण करून ‘२०१९ च्या कोल्हापूर-सांगली पुरावेळी तत्कालीन सरकारने दिलेल्या मदतीच्या धर्तीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याची सद्बुद्धी आणि मुजोर विमा कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळवून देण्याचे धैर्य आघाडी सरकारला दे’ असे साकडे आई तुळजाभवानी ला घातले.’

मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पिक तर गेलेच त्याच बरोबर जमीन देखील वाहून गेली आहे. त्यामुळे आगामी हंगामातही शेतकऱ्यांना उत्पादन घेणे शक्य होणार नाही. काही शेतकऱ्यांच्या शेतात तर अजूनही पाणी आहे. त्यामुळे राज्य सरकारने जास्तीत जास्त मदत करणे अपेक्षीत असल्याचे आमदार पवार यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या