औरंगाबाद : देशातील महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. कोरोनाचं संकट हळुहळु का होईना अटोक्यात येऊ लागलं आहे, मात्र महिलां सुरक्षिता आणि त्यांच्यावरील विघ्न दूर करावं असं गणपती बाप्पाला महिला पत्रकार डॉ.आरतीश्यामल जोशीने साकड घातलं.
आता कोरोना संसर्गात शिथिलता जानवत असून हळुहळु का होईना लोकांना पूर्ववत जगण्याचं आनंद घेऊन गणेशोत्सव साजरा केला. मात्र देशात नव्हे जगभरातील महिलांवरील अत्याचार थांबतच नाहीत. याबद्दल बोलतांना डॉ. जोशी म्हणाल्या जगातील महिलांवर जे विघ्न आलेलं आहे, तालिबानचं संकट हे देखील खूप मोठं आहे. मुंबईच्या घटना आहे, रोज बातम्यांमधून ज्या घटना समोर येतात त्या क्लेशदायक असतात. तुमची भक्ती, आराधना करण्यासाठी जर आम्ही महिला सुरक्षित असू, तर आणखी चांगल्या पध्दतीने तुझा कायम उत्कर्ष, तुला कायम स्मरणात ठेवावं यासाठी महिलांवरील विघ्न दूर कर’ असं ही डॉ. आरतीश्यामलने व्यक्त केले. त्याचप्रमाणे महिलांना सुरक्षित ठेवण्याचा आणि पुरूषांना देखील सद्बुध्दी द्यावी, असं ही गणपती बप्पाला साकडं घातलं आहे.
गणेशोत्सवाच्या पावन प्रसंगी गणपती बाप्पाला एकच प्रार्थना करते की, माझ्या देशातल्या, जगातल्या सगळया सुरक्षित जगण्याचे आणि समान अधिकार मिळू देत. तोच खरा आनंदाचा सण असेल. तू विघ्नहर्ता आहे, आणि गणेशोत्सवानिमित्त ‘ महाराष्ट्र देशा’ च्या कार्यालयात दररोज महिलांच्या हस्ते बाप्पाची आरती यानिमित्त महिला पत्रकारांना आमंत्रित केल्याबद्दल कृतज्ञा व्यक्त ही केली.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- विराटच्या ‘त्या’ निर्णयाला सेहवागचा विरोध; म्हणाला, ‘याला काहीच अर्थ नाही’
- पहिल्यांदा रकुल प्रीत सिंह झळकणार आयुष्मान खुराना सोबत ‘या’ चित्रपटात
- किरीट सोमय्यांवरील कारवाईमागे मुख्यमंत्री की गृहखातं ? गृहमंत्र्यांनी पहिल्यांदाच केलं भाष्य
- काय कुणाला सोडलेलं नाही; अजित पवारांवरील ‘त्या’ केसेस सुरु आहेत – चंद्रकांत पाटील