झोपडपट्टी पुनर्वसनासाठी रेल्वेच्या जमिनी राज्य सरकारला खरेदी तत्वावर द्या: आठवले

मुंबई  – मुंबईतील रेल्वे च्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी रेल्वेच्या जमिनी राज्य सरकारला खरेदी तत्वावर देण्यास परवानगी देणारा रेल्वे मंत्रालयाचा स्पष्ट आदेश काढण्यासाठी रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथोरिटी यांच्या अधिकाऱ्यांशी नविदिल्लीत लवकरच बैठक आयोजित करणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

आज मलबार हिल येथील सह्याद्री गेस्ट हाऊस येथे रेल्वे अधिकारी आणि एस आर ए यांची संयुक्त बैठक ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी पश्चिम रेल्वे चे मुख्य अभियंता रवींद्र राम आणि एस आर ए चे सचिव संदीप देशमुख, नगर विकास विभागाचे उपसचिव संजय बानाईत सह अनेक अधिकारी उपस्थित होते.

Loading...

या बैठकीला रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, प्रा.शहाजी कांबळे, झोपडपट्टी महासंघाचे मुंबई अध्यक्ष सुमित वजाळे, सरचिटणीस रतन अस्वारे, घनश्याम चिरणकर, उल्हास साळवी आदी अनेक पदाधिकारी होते.

मुंबईतील रेल्वे लगतच्या झोपड्यांचा सर्व्हे करण्यास रेल्वे ने मंजुरी दिली असल्याची माहिती डी आर एम यांनी दिली. तर रेल्वे च्या जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला रेल्वे जोपर्यन्त ना हरकत प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत झोपडपट्ट्यांचे पात्र अपात्र यादी करता येणार नाही त्यामुळे आता रेल्वे लगतच्या झोपड्यांचे सर्व्हेक्षण आता करता येणार नसल्याची अडचण एस आर ए च्या अधिकाऱ्यांनी मांडली.

दरम्यान तीन बंगला या अंधेरीतील झोपडपट्टी चा एकमेव सर्व्हे एस आर ए विभागाने केला आहे. अशी माहिती एस आर ए च्या अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे च्या जमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी रेल्वे ची जागा राज्य सरकार ने खरेदी केली पाहिजे त्यासाठी चा रेल्वे मंत्रालयाचा स्पष्ट आदेश काढण्यासाठी संसदेच्या अधिवेशन काळात रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि रेल्वे लॅन्ड डेव्हलपमेंट अथोरिटी ची बैठक घेणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका