सत्ता आमच्या हातात द्या महाराष्ट्र सुतासारखा सरळ करू

blank

टीम महाराष्ट्र देशा : “राज्याची सत्ता आमच्या हातात द्या, चँलेंज देऊन सांगतो, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करु”, अशी मागणी तृतीयपंथीय असलेल्या चांदणी गोरे यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकांनंतर कोणत्याच पक्षालाबाहुमत सिध्द करता आले नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. अशात नेमकी सत्ता कधी स्थापन होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. यामुळे “आमच्या हातात सत्ता द्या”, अशी मागणी तृतीयपंथी चांदणी गोरे यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या, ” नमस्कार माझे नाव चांदणी आहे. मी एक तृतीयपंथी आहे. निवडणुका होऊन 25 दिवस झाले आहेत. तरीही राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही. असं का होत आहे. राज्याचे राज्यपाल नागपूरवाल्यांचे ऐकतात की राष्ट्रपती गुजरातवाल्यांचे ऐकतात. हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे,” असं चांदणी यांनी म्हटलं आहे.

त्यानंतर त्या म्हणाल्या, “सर्वसामान्य जनतेचे का हाल होत आहेत. कांद्याचे दर किती कोसळले आहेत. महिला असुरक्षित आहेत. शेतकऱ्यांचे हाल किती चालले आहेत. पिकांचे नुकसान, त्यांच्या विम्याचे प्रकरण अरे कुठून नेऊन ठेवला आहे, माझा महाराष्ट्र” असा प्रश्नही चांदणी यांनी उपस्थित केला आहे. “आज आमच्या तृतीयपंथीयांना जाग येत आहे. माझं चॅलेंज आहे, आमचं सरकार आमच्या हातात द्या सगळे सुतासारखे सरळ येतील. सगळी प्रकरण योग्य मार्गे लागतील.” असेही त्या म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :