…तर गुजरातच्या ‘अमूल’ला राज्यात दूध संकलनाची परवानगी देऊ- सदाभाऊ खोत

पुणे: खाजगी दूधसंघ मनमानी करणार असतील, तर ‘अमूल’ला राज्यात दूध संकलनाची परवानगी देऊ; त्यामुळे शेतकर्‍यांना जास्त पैसे मिळतील. येत्या २ दिवसात यासंदर्भात बैठक घेण्यात येईल.
असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

काही दुधमहासंघ पूर्वीच्या सरकारमधील वजनदार नेत्यांचे त्यांनी बागुलबुवा उभा केला आहे.जाणीवपूर्वक सरकारला कोंडीत पकडण्यासाठी साखळी निर्माण केली आहे. असेही ते म्हणाले.

दरम्यान, बोगस बियाणांची आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करू तसेच कृषी विभागाने शिफारस केलेली कीटकनाशके विक्री करणे बंधनकारक असून दुकानदारांना ग्राहकांना पावती देणे बंधनकारक आहे. अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, आम्हीही शेतकरीच आहोत. ३ वर्षात शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या. याआधी ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ ऐवजी ‘पैसा आडवा पैसा जिरवा’ ही योजना राबविण्यात येत होती. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी सरकार तयार. ज्या वेळी आंदोलने उभारली त्या त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून मार्ग काढला. ज्यांना चर्चा करायची असेल त्यांनी चर्चेला यावे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेतून मार्ग काढू. असे खोत म्हणाले.

You might also like
Comments
Loading...