जनतेसाठी काम करण्याची सद्बुद्धी पांडुरंग ‘महावसुली’ सरकारला देवो !

जालना : कोराेना संकटाच्या काळात गरिब नागरिक, बारा बलुतेदार आणि व्यापारी त्रस्त आहेत. याकडे महाविकास आघाडी सरकारने तत्काळ लक्ष द्यावे, नसता जनता महाविकास आघाडीला धडा शिकवेल, असे मत माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलय. मंगळवेढा मतदार संघातील निकालावरही त्यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केलीय.

या संदर्भात आमदार बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, ‘पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने बेईमान सरकारला जागा दाखवली, आता तरी सरकारने शहाणं होण्याची गरज आहे. आतातरी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करण्याची सद्बुद्धी पांडुरंग ‘महावसुली’ सरकारला देवो !’

इतकच नाही तर महाराष्ट्र सरकारने जागे होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. ‘महाराष्ट्रात १०० कोटी रुपये वसुली केली, साधू संतांवर अन्याय-अत्याचार, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या महावसुली सरकारला पंढरपूर मतदारसंघातील जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. आता तरी महाराष्ट्र सरकारने जागे होण्याची गरज आहे.’ अशी टीका देखील आमदार लोणीकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या