fbpx

तुम्ही सत्ता द्या, मी मोहन भागवतांना जेलमध्ये टाकतो – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : कोणाकडे जर बंदूक सापडली, तर त्याला जेलमध्ये जावं लागतं. मग मोहन भागवतांकडेही शस्त्र असतात. तर त्यांना मोकळीक कशासाठी? कायदा सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर मला सत्ता दिलीत, तर मी मोहन भागवत यांना दोन दिवसासाठी जेलमध्ये घालेन. असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील प्रकाश आंबेडकर आणि मोहन भागवत यांच्यात शाब्दिक चकमक होत होती. ‘वाघ एकटा असेल, तर जंगली कुत्रे आक्रमण करुन त्याला संपवणारच. आपल्याला हे विसरता कामा नये’ असं मोहन भागवत अमेरिकेत विश्व हिंदू काँग्रेसच्या परिषदेत म्हणाले होते. देशातील विरोधीपक्षांना कुत्रा संबोधल्याचं सांगत प्रकाश आंबेडकरांनी भागवतांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.

दुसरीकडे ‘संघाच्या घरात धाडी मारण्याचे धैर्य पोलिसांनी दाखवले आणि डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरातून शस्त्रसाठा पकडणाऱ्या पोलिसांचं अभिनंदन करतो. आता पोलिसांनी नागपूर येथील रेशीमबागमध्ये धाड मारावी, तिथे एके 47 सापडतील’, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली होती.