मावळ लोकसभेची उमेदवारी जगतापांना द्या; बारणे कुटुंबातील नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टीम महाराष्ट्र देशा – मागील चार वर्षापासून दोन्ही पक्षात सुरु असणारी तूतु मै मै थांबवत, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. युती संदर्भात शहा आणि ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली.

युती नंतर मात्र महाराष्ट्रात शिवसेना-भाजप दोन्ही नेत्यांकडून लोकसभेच्या जागा कश्या आपल्या पक्षाकडे येतील याची फिल्डिंग लावयला सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवर असणारे मतभेद पाहता. भाजप नेते देवेंद्र फडणवीस तर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे हि मागिनी करत आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदार संघ भाजपकडे घेण्यात यावा आणि भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या बारणे कुटुंबातील नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (मंगळवारी)एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले आहेत. त्यावेळी पिंपरी महापालिकेतील बारणे कुटुंबातील नगरसेवकांनी मावळातून आमदार जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांच्याकडे केली. या निवदेनावर नगरसेवक अभिषेक बारणे, कैलास बारणे, झामाबाई बारणे, माया बारणे, अर्चना बारणे यांच्या स्वाक्ष-या आहेत. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके यांच्यासह चिंचवड मतदार संघातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...