ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या; अन्यथा आंदोलन करू: प्रकाश शेंडगे

blank

मुंबई: सद्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अंतरिम सुनावणी सुरु आहे. २७ जुलै रोजी महत्वाचा निकाल येणे अपेक्षित असून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आज कोर्टाकडून दिलासा देण्यात आला आहे. तर, राज्य सरकारकडून अनेक बड्या वकिलांची फौज या लढ्यासाठी नियुक्त करण्यात आली आहे.

आता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष न दिल्यास आंदोलन करू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तसेच, सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर ओबीसी समाजाचीही बाजू मांडायलाच हवी, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

आनंदाची बातमी: भारतीय कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात

“मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलची अंतिम सुनावणी सुरु आहे. पण, ओबीसी समजाचं काय? हे सरकारही आमच्याकडे दुर्लक्षच करत आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं, म्हणून त्यांना भेटीसाठी वेळ मागितली आहे. जर असं झालं नाही, तर २० ते २५ तारखेपर्यंत आंदोलन करणार”, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला. तसेच, “ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. राज्य सरकारने आमची बाजू मांडायलाच हवी”, अशी मागणीही प्रकाश शेंडगे यांनी केली आहे असे वृत्त टीव्ही ९ ने दिले आहे.

‘शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्याचे ढोंग करून फसवत आलात,आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवायला लागलात’

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकरीत १३ टक्के आरक्षण आहे. मात्र मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातील आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याने, हे आरक्षण रद्द करण्याची मागणी  याचिकाकर्त्यांनी केली आहे. यावर, कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारने दिलेले आर्थिक आरक्षण देखील ५० टक्क्यांच्या वर जात असताना केवळ मराठा आरक्षणालाच विरोध का? असे म्हणत आपली भूमिका मांडली आहे.

ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको,देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिलेली नाही. आता मराठा आरक्षणप्रकरणी 27 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. 27,28 आणि 29 अशी तीन दिवस सुनावणी होईल.