‘सुशांतला न्याय द्या,’ फडणवीसांच्या बिहारमधील सभेत घोषणाबाजी

sushnat

गोपालगंज : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा मुद्दा बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपस्थित होईल, असा अंदाज गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केला जात होता. शनिवारी भाजपच्या एका प्रचारसभेत हेच दिसून आलं.

या सभेला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सभेला उपस्थितांपैकी काही लोक सुशांतचे पोस्टर घेऊन आले. सुशांतला न्याय द्या, अशी त्यांनी घोषणाबाजी केली. सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस सध्या बिहारमध्येच तळ ठोकून आहेत.

भाजपकडून फडणवीस यांनाच बिहार निवडणुकीच्या प्रभारीपदी नेमण्यात आलं आहे. त्यामुळे फडणवीस भाजप आणि जनता दल(संयुक्त) यांच्या युतीसाठी प्रचारसभाही घेताना दिसत आहे.

फडणवीस यांनी गोपालगंज येथे भाजप उमेदवार सुभाष सिंह यांच्यासाठी एक प्रचारसभा आयोजित केली होती. सभेला प्रचंड गर्दी जमली. सभेला सुरुवात होताच काही लोकांनी सुशांत सिंह राजपूतचे पोस्टर उंचावून घोषणाबाजी सुरू केली. सुशांतला न्याय द्या, अशी घोषणाबाजी लोक करू लागले. हे पाहून फडणवीस व्यासपीठावर उभे राहिले. त्यांनी सर्वांसमोर हात जोडले. यानंतर काहीही न बोलता ते पुन्हा खाली बसले.

महत्वाच्या बातम्या-