हैद्राबाद पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या – धैर्यशील माने

टीम महाराष्ट्र देशा : हैद्राबादमधील झालेल्या प्रकरणावर आता सर्वच स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहे. आता पर्यंत अरविंद सावंत, स्मृती इराणी, रामदेव बाबा, अशा सर्वच स्तरातील लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामान्य लोकांनी देखील या पोलिसांच्या कारवाई पाठिबा दर्शवला आहे.

शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी हैदराबाद चकमकीचं समर्थन केलं असून पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी एक मागणी देखील केली. ते प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे. कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्या पोलिसांना राष्ट्रपती पदक दिलं पाहिजे. आता त्यापीडितेच्या आत्म्याला शांती लाभली असेल. या चकमकीमुळे देशासमोर एक उदाहरण उभं राहिलं असून हे गरजेचं आहे. मी त्या कुटुंबासोबत आहे”.

पुढे ते म्हणतात, “अनेक लहान मुलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत असून, पोलिसांनी अशाच पद्धतीने कंठस्नान घातलं पाहिजे, चकमकीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर धैर्यशील माने यांनी टीका केली आहे. त्यांच्या घरी असाच प्रकार झाला असता तर हे असं बोलले असते का ? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा झाला आहे. तेलंगणा पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या याचारही आरोपींचा जागीच एन्काऊंटर केला आहे. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी या चारही आरोपींना जागीच संपवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या