अमरावती : कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला, अनाथ झालेली बालकं यांना भरीव मदत देण्याची मागणी आक्रमक पवित्रा घेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी लोकसभेत केली. कोरोनाच्या भयावह स्थितीवर खासदार नवनीत रवी राणा यांनी लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतला.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या विधवा, आई-वडिल गमावणारे अनाथ बालकं, एकट्या राहिलेल्या स्त्रिया यांना केंद्र सरकार काय मदत करणार? ज्या राज्यांचे सरकार जबाबदारी झटकत आहेत, त्यांच्यावर कोणती कारवाई होणार, केंद्र सरकार व राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी खासदार राणा लोकसभेत केली.
महिला बालकल्याण व बाल विकास प्रकल्पाने कोरोना काळात विधवा झालेल्या व अनाथ झालेल्या बालकांसाठी विशेष धोरण तयार करून मदतीचा हात द्यावा, महाराष्ट्र सरकार याबाबतीत कमी पडत असल्याचे खासदार राणा यांनी सांगितले. त्यांच्या प्रश्नांची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सभागृहात अभिवचन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला
- ‘रात्रीच्या वेळचा बंद केलेला सिंगल फेज वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा’, आ.श्वेता महाले यांची मागणी
- ‘राजकारणातून समाजसेवा करणारा नेता हरवला’, प्रियांका गांधींकडून श्रध्दांजली
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत
- ‘महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू नाही’, खा.संजय राऊत यांचा दावा