मतदारांना भेटवस्तू द्या ; चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

टीम महाराष्ट्र देशा: ”बूथ रचना झाली आहे, १५ दिवसात कार्यकर्त्यांनी २०० घरी जाऊन मतदारांशी संपर्क वाढवला पाहिजे. भेट घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना भेटवस्तू द्या, ” अस वादग्रस्त वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यांनी केल आहे. सांगलीमध्ये भाजपने कार्यकर्त्यांचं बूथ प्रशिक्षण आयोजित केल होतं. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना हा अजब सल्ला दिला आहे.

सांगली महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना आतापासूनच मैदानामध्ये उतरवलं आहे. भाजपनेही महापालिकेत सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे.

You might also like
Comments
Loading...