“महापालिकेला पूर्ण वेळ आयुक्त द्या” – आमदार अंबादास दानवे

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रदीर्घ रजेवर गेलेले महापालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक यांनी आपली रजा वाढवून घेतली. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या शहरातील विकासकामांना खीळ बसली आहे. आरोग्य, कचरा, रस्ते, पाणीपुरवठा अशी अनेक महत्वाची कामे रखडल्याने महापालिकेला पुर्णवेळ आयुक्त द्यावा अशी मागणी करणारे निवेदनवजा पत्र शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले आहे.

गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद महापालिकेला आयुक्त नाही. डॉ. निपूण विनायक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच प्रदीर्घ रजेवर निघून गेले होते. त्यांचा पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. दहा तारखेपर्यंत डॉ. निपुण विनायक यांची रजा होती , त्यांनी पुन्हा रजा वाढवून घेतली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत प्रभारी कार्यभार पाहण्याच्या सूचना असल्याने ते मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेला हजर राहिले नाहीत.

Loading...

परिणामी महापालिकेची सर्वसाधारण सभा देखील आयुक्तांच्या गैरहजेरीतच झाली. शहरात डेंगीमुळे गेल्या दोन महिन्यात 11 जणांचे बळी गेले आहेत. शहरात कचऱ्याचा, सार्वजनीक आरोग्याचा, पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे तर महापालिका प्रशासनाचे प्रमुखच कार्यालयात रहात नसल्याने संपुर्ण प्रशासकीय यंत्रणाच सुस्तावली आहे.

आयुक्त प्रदीर्घ रजेवर असल्याने दैनंदिन कामात अनंत अडचणी येत आहेत. नजीकच्या काळात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला कायमस्वरुपी आयुक्त मिळणे गरजेचे आहे. राज्यपाल महोदयांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन महापालिकेत कायमस्वरुपी आयुक्तांची नेमणूक करावी अशी विनंती देखील या पत्रात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत