दलिताला प्रत्येक पाच एकर जमीन द्या! ; जिग्नेश मेवानी

मेवानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला

हैदराबाद : काही दिवसांपासून चर्चेत असलेले गुजरातमधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन देण्याची मागणी केली आहे. काल गुरुवारी, तुरुंगात असलेले दलित नेते मंदा कृष्ण मडिगा यांची भेट घेतल्यानंतर मेवानी यांनी ही मागणी केली. जवळपास ७० टक्के दलित भूमिहीन आहेत. त्यामुळे प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन दिली पाहिजे. मडिगा यांची भेट घेतल्यानंतर मेवानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काय म्हणाले जिग्नेश मेवानी?

दलितांच्या उद्धारासाठी समविचारी नेते एकत्र येणार आहेत आणि आम्ही देशव्यापी आघाडी उभी करणार आहोत. अनुसूचित जमातींच्या वर्गीकरणाच्या मागणीसाठी परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे मडिगा यांना पोलिसांनी अटक केली आहे. जमीन हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गुजरातमध्ये प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन दिली जावी, अशी माझी मागणी आहे; तर प्रत्येक दलिताला तीन एकर जमीन द्यावी, अशी मडिगा यांची मागणी आहे. येत्या काही दिवसांमध्ये आम्ही दलितांसाठी देशव्यापी आघाडी उभी करणार आहोत. यात माझ्यासह मडिगा आणि इतर पुरोगामी, दलित नेते सहभागी होणार आहेत. मडिगा यांच्या अटकेचाही मेवानी यांनी निषेध केला. ‘तेलंगणा सरकार आणि पोलिसांनी मडिगा यांची सुटका करावी. मडिगा हे त्यांच्या समूहाच्या घटनात्मक हक्कांसाठी झगडत आहेत. एखाद्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर अशी गदा आणू नये’

You might also like
Comments
Loading...