fbpx

मोदींची मैत्री टिकवण्यासाठी दाउद, मसूद, हाफिजला भारताकडे द्या : दिग्विजय सिंह

Digvijay

टीम महाराष्ट्र देशा : काल पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे. अशातच कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत. त्यांनी ही दोस्ती निभावण्यासाठी पाकिस्तानने मसूद अजहर, दाऊद इब्राहीम आणि हफिज सईदला भारताकडे सोपवावं’ असं विधान कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘घोषणा करून काय होणार ? पाकिस्तानने वरील दहशतवाद्यांना भारताच्या सुपूर्त करावे’ असं वक्तव्य केल आहे.

तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देखील मसूद अजहरवर कारवाई नेमकी निवडणुकांच्या काळातच झाली, असं म्हणत संशय व्यक्त केला आहे.