‘आठ दिवसांत कोरोना काळातील बिले द्या, अन्यथा..’ आ. धस यांचा इशारा

suresh dhas

बीड : कोविडच्या संकटात सेवा दिलेले कोविड कंत्राटी कर्मचारी, भोजन व्यवस्था व इतरांची देयके जिल्हा प्रशासनाने रखडवली आहेत. आठ दिवसांत संबंधिताना जर देयके दिली नाहीत तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात बोंब मारो आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला आहे.

धस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यात कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याइतके पैसे जिल्हा प्रशासनाकडे नसावेत ही दुर्दैवी बाब आहे. कोरोना बाधितांकडे जेंव्हा त्यांचे नातेवाइक दुर्लक्ष करत होते तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्राणाची बाजी लावत रुग्णांना कोविडमधून बाहेर काढण्याचे काम केले.

मात्र, या कोविड योद्ध्यांना वेतनदेखील सरकार देत नसेल तर लाजिरवाणी बाब आणखी काय असू शकतेॽ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील महिन्यात बीडला येऊन कोविडबाबत आढावा बैठक घेतली. मात्र, जिल्ह्याच्या पदरी अद्यापही अपेक्षित असे काहीही हाती आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP