‘येत आहेत तेवढे भाजपात घ्या, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा रासपला द्या’

टीम महाराष्ट्र देशा : रासप हा नेहमी प्रस्थपीतांच्या विरोधात लढत देणारा पक्ष आहे,महादेव जानकर यांनी ते वेळोवेळी दाखवून दिले आहे. तसेच आज काँग्रेस – राष्ट्रवादीची मात्तबर मंडळी भाजप- सेनेत प्रवेश करत आहेत, जे पक्षात येत आहेत त्यांना जरूर घ्यावे पण काँग्रेस राष्ट्रवादीचे बालेकिल्ला असणारे मतदारसंघ रासपला द्यावेत, अशी मागणी रासप नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

उद्या शिवाजी पार्क मुंबई येथे रासप 16 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, बारामती, इंदापूर, माळशिरस, कराड, पंढरपूर, मंगळवेढा असे अनेक मतदार संघ महायुतीकडे मागितले आहेत. रासप या मतदारसंघातून विजयश्री खेचून आणेल. तसेच आज रासपला पक्ष मान्यतेच्या दृष्टीने जास्तीत जास्त जागा लढणे आवश्यक आहे, अवघड जगेवरती आम्ही लढून विजय मिळवू, असा विश्वास लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला.

Loading...

दरम्यान राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांमध्ये जागावाटप कशापद्धतीने होणार यावरून तर्क – वितर्क लावले जात आहेत. तसेच मित्रपक्ष ही जागांची मागणी करत आहेत. तर रासपा ने युतीकडे 57 जागांची मागणी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
तानाजी चित्रपटातील 'तो' आक्षेपार्ह भाग वगळावा; नाभिक समाजाची मागणी
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले