साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारने शिफारस करावी – विखे

vikhe

अहमदनगर : महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देवून गौरव करावा यासाठी राज्य सरकारने शिफारस करावी, अशी मागणी माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात आ. विखे पाटील यांनी म्हटले आहे की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे या मागणीसाठी राज्यात सुरु झालेल्या चळवळीला माझा पाठींबा असुन, आण्णाभाऊ साठे यांनी साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा विचार करुन राज्?य सरकारनेही या पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याबाबत त्यांनी सुचित केले.

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यामध्ये अमुल्य असे योगदान दिले. ३५ कादंबऱ्या, १५ नाट्यसंग्रह, पटकथा, लावणी, पोवाडे इत्यांदीच्या विपूल अशा लेखानातून मराठी साहित्याला सातासमुद्रापार पोहचविले आहे. त्यांच्या साहित्यकृतींची अन्य भाषांमध्येही भाषांतरे झाली. मार्क्स, डॉ. आंबेडकर अशा विचारवंतांच्या प्रभावाने आण्णाभाऊ साठे यांनी सोशित, वंचित समाजाचे दु:ख आपल्या साहित्यातून आधोरेखीत केले. त्यांचे कार्य केवळ एका समाजापुरते सिमीत नसुन सर्वच समाज घटकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. अण्णाभाऊ साठेंच्या योगदानाचा यथोचित गौरव भारतरत्न पुरस्काराने झाल्यास तो महाराष्ट्राचाही सन्मान ठरणार असल्याने याबाबत आपण केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

राज्यासाठी अतिरिक्त पाच लाख मेट्रीक टन युरिया देण्याची केंद्र शासनाकडे मागणी

दुसरीकडे, लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा भारतरत्न किताबाने मरणोत्तर गौरव व्हावा. यंदा अण्णा भाऊसाठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त जागतिक कीर्तीचे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न ‘किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा अशी आमची मागणी असून या मागणी चे पत्र आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची यंदा 1 ऑगस्ट रोजी येणारी जयंती जन्मशताब्दी महोत्सव असून मोठया उत्साह आनंद बहुजन समाजात आहे. मात्र सध्या कोरोना च्या महामारी ने उच्छाद मांडला असल्याने यंदा लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती बाहेर गर्दी न करता घरी राहून साजरी करावी आणि कोरोनाचा धोका टाळावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

चिंताजनक : देशात कोरोनाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले; एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाखांच्या पुढे