आता पीएफची रक्कम जाणून घ्या फक्त एका मिस्ड कॉल वर!

011-2290 1406 या नंबर वर मिस्ड कॉल द्या

वेब टीम:- तुम्हला जर पीएफची रक्कम जाणून घेण्यास व्यत्यय येत असेल किंवा तुमच्या पीएफ खात्यात रक्कम नक्की किती जमा होते. यांची माहिती मिळण कठीण जात असेल तर आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. आता फक्त एका मिस्ड कॉल किंवा एसएमएस वर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती मिळणार आहे.

तुम्ही ईपीएफओ च्या कागदपत्रावर रजिस्टर केलेल्या नोंदनीकृत मोबाइल नंबर वरुन 011-2290 1406 या नंबरवर मिस्ड कॉल करा त्यानंतर ताबडतोब तुम्हाला एक एसएमएस प्राप्त होईल ज्यामधे तुम्हाला तुमच्या पीएफच्या रक्कम व त्यांबद्दलची सर्व माहिती मिळेल. पीएफच्या रक्कमेबद्दल कायमच आपल्या मनात संभ्रम असतो मात्र आता मिस्ड कॉल सुविधेमुळे शिल्लक रक्कम समजण्यास मदत होईल. तुम्ही ऑनलाइन देखील पीएफ जाणून घेऊ शकता त्याचबरोबर पासबुक बद्दलची माहिती देखील घेऊ शकता. त्यासाठी UAN अर्धात यूनिवर्सल अकाउंट नंबर रजिस्टर असणे  गरजेचे आहे.

You might also like
Comments
Loading...