‘आमच्या घराला मदतीचा हात द्या’, प्राजक्ता माळीने केली विनंती

प्राजक्त माली

मुंबई : मराठी चित्रपटश्रुष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिचे चाहते देखील तिच्या या फोटोंवरती भरभरून कंमेंट करत असतात.  तिचे हे फोटो चाहत्यांना फार आवडले आहेत.  यावेळी मात्र प्राजक्ताने तिच्या सर्व चाहत्यांना एक विनंती केली आहे.

सोशल मीडियावर प्राजक्ता माळीने एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, ‘मी सर्वांना विनंती करते की “आमचं घर” ही एक सामाजिक संस्था आहे, जी ठाण्यात राहणाऱ्या गरीब बांधवांसाठी, मुलांसाठी आणि ज्या वृद्धांना कोणीही आधार नाही त्यांना या संकट काळी मदत करण्याचे काम करत आहे. तरी “आमचं घर” ला त्यांचे हे समाज कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी मदत कराल अशी आशा आहे. मी माझ्यापरीने एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हां सर्वांना विनंती करते की तुम्ही ही “आमचं घर” ला मदतीचा हात द्या ‘ अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.

प्राजक्ता माळीने आपल्या सुंदरतेने तसेच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP