स्वस्त धान्य दुकानदारांना २४ तासाचे अल्टीमेटम द्या! – खा. इम्तियाज जलील

imtiaz-jaleel

औरंगाबाद : स्वस्त धान्य दुकानदारांनी दि. १ मे पासून बंद पुकारला आहे. त्याचे परिणाम हातावर पोट असलेल्या नागरिकांवर होत आहे. दुकानदारांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा एमआयएम जिल्हाधिकाऱ्यांकडे परवाने रद्द करण्याची मागणी करणार आहे. याविषयी स्वस्त धान्य दुकानदारांना २४ तासाचे अल्टीमेटम जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे असे जलील यांनी सांगितले.

सध्याचा काळ हा गंभीर आहे. रेशनच धान्य घेणारा वर्ग शहरात मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाने धान्य मोफत देण्याबाद्दल घोषणा केली पण फक्त दुकानदारांचा अंगठा राहू द्या हि मागणी धरत स्वस्त धान्य दुकानदारांनी बंद पुकारला. त्यामुळे गरिबांचे नुकसान होत आहे. सोमवारी झालेल्या लोकप्रतिनिधींच्या आढावा बैठकीत हा प्रश्न मांडण्यात आला. त्यावर दुकानदारांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

दुकानदारांनी जर हेच धोरण ठेवले तर त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी करणार असून दुकानदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी २४ तासाचे अल्टीमेट्म द्यावे म्हणजे दुकानदार दुकान उघडतील. त्यमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना शनी मिळेल तसेच सगळ्या दुकानांचे ऑडीट करायला लाव्यास दुकानदारांचे काय ते सगळ समोर येईल असे हि जलील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या