पावसाळ्यात मुलींनी ‘हे’ परिधान करा ! म्हणजे राहता येईल ‘ट्रेंडी’

blank

मयुरी पवार: पावसाच्या पडणाऱ्या सरीवर सरी… त्यात जीन्स घालणं म्हणजे घोडचूक. ऑफिस, कॉलेज मध्ये जाणाऱ्या तरुणींसाठी हा एक मोठा प्रश्नच असतो. त्यासाठी पावसाळ्यात काय घालायला हवे ? म्हणजे ‘ट्रेंडी’ही राहता येईल आणि आपण सुंदरही दिसु हे जाणून घेवूया.

त्यासाठी आपल्या प्रिय जीन्सला सध्यातरी बाय… अश्या ढगाळ वातावरणात ब्राईट कलर नक्कीच ईन आहेत खास करून पिवळा, हिरवा,लाल आणि त्यातही ह्या रंगसंगतीला जोड म्हणून बाजारात विविध शेड्स सुद्धा उपलब्ध आहेत.

मुलींनी काय परिधान करावे ?

बेल स्लीव्ज- हाताच्या कोपऱ्यापासून मोकळ्या सोडलेल्या ह्या स्लीव्ज सध्या ‘स्ट्रीट फॅशन’ म्हणून खूप प्रचलित आहेत खास करून शिफाॅन मध्ये ह्या बाजारात उपलब्ध आहेत. गडद जांभळ्या किंवा कत्थई रंगाच्या ह्या टाॅपखाली डेनिम शोॅट्स किंवा कॅप्री वापरू शकता. वातावरण ढगाळ असल्यामुळे मेकअप शक्यतोर साधारणच असावा पण त्याखेरीज त्वचा तेलकट असल्यास चांगल्या प्रतीचे फौन्डेशन चेहऱ्याला ब्राईट लूक देण्यासाठी योग्य ठरेल.

blank

केप्स आर ईन- सध्याचा सुपर हिट असलेला ट्रेंड ज्याला केप्स म्हनुन प्रसिद्धी आहे. हा केप्स काय प्रकार आहे? केप्स म्हणजे टाॅपच्या गळ्याभोवती येणारा व मागील बाजूस लावलेले बाह्य कापड ज्याला स्लीव्ज नसतात. हा ट्रेंड जितका पावसाळ्यात तितकाच उन्हाळ्यात देखील योग्य आहे, सोबत डेनिमची पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची शाॅट्स आणि अॅकल स्ट्रेप सँडल म्हणजे तुमचा लूक तयार.

blank

मॅक्सीज- नवीन हवा असलेल्या मॅक्सी ची चर्चा आणि ट्रेंड पुन्हा बाजारात आली आहे. पायघोळ असलेल्या ह्या ड्रेस च्या तुफान दिवाण्या झालेल्या तरुनींची पाहिली पसंती म्हणजे मॅक्सी. ह्या पावसाळ्यात तुमच्या कपाटात मॅक्सीची जागा पक्की. निळ्या रंगाच्या तसेच शिफाॅन आणि कॉटन मध्ये ह्यांना जास्ती पसंती आहे, मॅक्सीवर स्काय हाय हिल्स किंवा बेलीज उत्तम पर्याय आहे.

blank

ब्राईट फ्लोरल प्रिंट- मान्सून फ्रेन्डली किंवा एव्हर ग्रीन असं म्हंटलं तरी चालेल असा हा ट्रेंड. पावसाळ्यात आपल्या कपड्यांवर असलेलं रंगीबेरंगी फुलांचं आकर्षण तरुणींना वेड लावणारं आहे. ह्यातही झीप फ्रंट आणि ए-लाईन हे ड्रेस आघाडीवर आहेत. पायात पांढरे शूज किंवा हिल्स व हातात एक छोटी हँड्बॅग ह्यामुळे तुमचा लूक उठून दिसेल. फ्लोरल प्रिंट मध्ये तुम्ही प्लाझो हा ट्रेंड सुद्धा ट्राय करू शकता.

blank

क्रॉप टोॅप आणि हाय वेस्ट पेन्सिल स्कर्ट- कंबरे पर्यंतच येणारा हा टोॅप व गुडघ्यापर्यंत फिट बसेल अशी स्कर्ट आणि त्या खाली मेटॅलिक सँडल तुमचा रॉकिंग पावसाळी लूक कम्प्लीट करतं. जर तुमची पावसाळी ‘रोमँटिक डेट’ असेल तर हा लूक तुम्ही नक्कीच ट्राय करा.

blank