मुलीनां आपल्या प्रियकरामध्ये हवेच असतात हे गुण.

blank

कोणत्याही मुलीच्या मनात आपल्या जीवनसाथी विषयी अनेक अपेक्षा असतात.तो त्या अपेक्षांच्या चौकटीत कुठेना कुठे बसावा अशी त्या मुलींची अपेक्षा असते. मुलीना त्यांचा जीवनसाथी हा स्वताच्या विचारांचा असावा.अशी अपेक्षा असतात .
पुरुषांमध्ये बरेच चांगले गुण असतात ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात. विशेष म्हणजे ते गुण ते स्वत: विकसित करीत असतात. त्यात दुसऱ्यांचा आदर करणे, प्रेमाने बोलणे आणि सत्याच्या बाजूने राहणे आदी असे बरेच गुण आहेत जे पुरूषांच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवितात. महिलांनाही या गुणांचे पुरुष चांगले वाटतात. जाणून घेऊया पुरुषांमधले हे चांगले गुण जे अन्य पुरुषांनाही आत्मसात करायला हवेत.

in-relationship-1-1502193006

* सत्याची बाजू न सोडणे
चांगला पुरुष कधीही चुकीच्या बाजूची साथ देत नाही, यासाठी त्याला आपल्यांच्या विरोधात जरी उभे राहावे लागले तरी चालेल पण तो कधीही आपला आत्मसन्मान गहाण ठेवत नाही. अशा पुरुषांचे महिलांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण होते.

* महिलांचा आदर करणे
चांगल्या पुरुषाची ओळख म्हणजे ते नेहमी महिलांचा आदर करतात. मग त्याची स्वत:ची पत्नी असो वा अन्य दुसरी महिला, तो प्रत्येक महिलेचा सन्मान करतो असे पुरुष महिलांना खूप आवडतात. आदर हा लहान-लहान गोष्टीतून दिसून येतो,जसे की कोणत्याही ठिकाणी गेले तर त्यांने दरवाजा ओपन करावा.किवां लहान लहान गोष्टीत मत विचारावे.

blank

* विचारपुर्वक काम करणे
समजदार पुरुष प्रत्येक काम करण्याअगोदर विचारपुर्वक करतो, त्यामुळे तो आपल्या प्रत्येक कामात यशस्वी होतो. महिलांनाही असे पुरुष खूप आवडतात जे भावनेच्या भरात कोणताच निर्णय घेत नाहीत आणि परिस्थितीनुसार व्यवहार करतात.

* आपल्या कुटुंबासाठी पुरेसा वेळ देणे
कामानिमित्त बरेच लोक आपल्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकत नाही मात्र एका चांगल्या पुरुषाची ओळख म्हणजे की तो नेहमी आपले कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांसाठी वेळ काढतो.

* प्रामाणिकपणा
एक चांगला पुरुष प्रामाणिकपणामुळेही ओळखला जातो. तो फक्त कामाच्या ठिकाणीच नव्हे तर परिवारातही अगदी प्रामाणिकपणे आपले नाते निभवित असतो. असे पुरुषही महिलांना खूप आवडतात,.

relationship