fbpx

कास्टिंग काऊचमध्ये मुलीच आधी पुढाकार घेतात; कॉमेडियन अभिनेता कृष्णाच्या विधानाने खळबळ

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशात कास्टिंग काऊच हे प्रकरण सध्या चांगलच चर्चेत आहे.  सिनेजगतापासून ते राजकारणापर्यंत वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. यामध्ये अनेक अभिनेत्रींने आपला अनुभव जगासमोर मांडला आहे. तर यात काही महाशायांने महिलांनाच दोषी ठरवलं आहे. अशा महाभागांमध्ये आता कॉमेडियन अभिनेता कृष्णा याची भर पडली आहे.
‘बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचसारखी प्रकरणं होत नाही. हा सगळा एक फसवण्याचा डाव आहे. कास्टिंग काऊचमध्ये आधी महिलाच पुढाकार घेतात आणि नंतर समोरच्यावर नाव ढकलतात.’ एका मुलाखती दरम्यान कृष्णाने हे वक्तव्य केलं आहे. तसेच ‘कॉर्पोरेट क्षेत्रात कास्टिंग काऊचसारखी प्रकरण जास्त प्रमाणात होतात. पण आमच्यावरच नेहमी आरोप केले जातात कारण आम्ही मीडियावाले आहोत.’ जर व्हायचंच असतं ना तर कास्टिंग काऊच कॉलेजमध्येही झालं असतं. असे देखील कृष्णा पुढे म्हणाला आहे.
अभिनेता कृष्णा याच्या या वक्तव्याने नवीन वाद होण्याची शक्यता आहे. त्याच्या या विधानावर अजूनपर्यंत काही प्रतिक्रिया आली नसली तरी कृष्णा आता चांगलाच वादात सापडला आहे.