मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनींना दिली अजब शपथ

अमरावती : आज जागतिक प्रेम दिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन्स डे. आपल्या मनातील प्रेम भावना प्रत्येक प्रियकर- प्रेयसी ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशी व्यक्त करत असतात. मात्र या जागतिक प्रेमदिनाच्या दिवशी अमरावतीच्या महाविद्यालयात विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची अजबगजब शपथ देण्यात आली. प्रेम, प्रेम विवाह किंवा हुंडा घेऊन लग्न न करण्याची शिक्षकांनीच या विद्यार्थिनींना शपथ दिली आहे.

अलीकडे तरुण- तरुणींच्या प्रेम प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आज अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ घेतली आहे.

Loading...

अमरावतीच्या टेंभुर्णी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) निवासी शिबीरात या विद्यार्थीनींनी हिंगणघाट घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहिली. तर एकीकडे 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन्स डे हा प्रेमाचा दिवस साजरा केला जात असताना, त्याच्या पूर्वसंध्येला मुलींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली.

‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’ अशी शपथ विद्यार्थिनींकडून घेण्यात आली.

अलीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आपला निर्णय उपयुक्त ठरेल, असा विश्वास विद्यार्थिनींनी व्यक्त केला आहे. अमरावतीच्या मुलींचा आदर्श घेण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडाच्या पार्श्वभूमीवर या शपथेला वेगळं महत्त्व आलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन