मोबाइल नंबर देण्यास नकार दिल्यानं मुलीला जाळले

लखनऊ – मोबाइल नंबर देण्यास नकार दिल्यानं सतरा वर्षांच्या मुलीला जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना लखनऊमध्ये घडलीय.या मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत .दरम्यान ही मुलगी 80 टक्के भाजल्यानं तिची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद शफीला अटक करण्यात आलीये.

लखनऊमधील आझमगढमधील अल्पवयीन दलित मुलीनं मोहम्मद शफी या तरुणाला तिचा मोबाइल क्रमांक देण्यास नकार दिला होता. त्याचा राग मनात धरुन त्यानं तिला पेटवलं. त्यामध्ये ती 80 टक्के भाजली असून तिच्यावर शिव प्रसाद गुप्ता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर अनुसूचित जाती आणि जमातीच्या अध्यक्ष ब्रिज लाल यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पीडित कुटुंबाला साडे आठ लाख रुपयांची मदत दिली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर देखील दिलं जाणार आहे.