पुण्यात डंपरच्या चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू 

death-of-the-girl-under-the-wheels-of-a-dumper-in-pune

पुणे : येरवडा परिसरातील शास्त्रीनगर सिग्नल चौकात ट्रकच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गाडी चालवताना नजर दुसरीकडे गेल्याने अवघ्या तीन सेकंदात या तरूणीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली.घटना पुण्याच्या येरवडा परिसरात घडली.

शास्त्रीनगर चौकात ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव भाग्यश्री रमेश नायर असे आहे. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. शास्त्रीनगर चौकातील सिग्नल सुटल्यावर निघालेल्या तरुणीने डावीकडे पहात उजवीकडे गाडी वळवली. तिला उजवीकडे वळायचे होते. मात्र ती रस्त्याच्या अगदी डावीकडून दुचाकी चालवत होती. उजवीकडे वळताना तिने काही क्षणांसाठी डावीकडे पाहिले. मात्र वळतानाच तिच्या उजवीकडून येणाऱ्या एका डंपरच्या पुढच्या चाकाला धडकली आणि खाली पडली. भाग्यश्री त्याच डंपरच्या मागच्या चाकाखाली जागेवरच तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी डंपर चालक सागर चौगुले याला ताब्यात घेतले आहे.