VIDEO- ‘तेरे इश्क में नाचेंगे’, धोकेबाज बाॅयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून तरुणीचा राडा !

this-girl-danced-onto-the-tunes-of-raja-hindustani-after-allegedly-getting-ditched-by-boyfriend

नवी दिल्ली – प्रेमात धोका दिला म्हणून एका तरुणीने दारूच्या नशेत राडा घातलाय. हा राडा काय साधासुधा नाहीये. प्रेमभंग झालेल्या या तरुणीने बाॅयफ्रेंडच्या घरासमोर डीजे लावलाय आणि ‘तेरे इश्क में नाचेंगे’ या गाण्यावर तुफान डान्स केलाय.

धोका देणाऱ्या बॉयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून तरुणीनं राडा घातल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झालीय. संदीप सहवाग नावाच्या फेसबुक युझरने यासंदर्भातील व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केलेत.

व्हिडिओमध्ये एक तरुणी दारु पिऊऩ डीजेसमोर डान्स करताना दिसत आहे. राजा हिंदुस्तानी सिनेमातील तेरे इष्क में नाचेंगे गाण्यावर ती नाचत आहे.

या तरुणानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, “गुरुग्रामच्या पटौदी शहरातील हेलमंडीमध्ये एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून डान्स केला. बॉयफ्रेंडनं धोका दिल्यानं तीने हे कृत्य केलंय”

सोशल मीडियावर हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. पण याची कुणीही सत्यता पडताळलेली नाही. पण हा व्हिडीओ खरा असल्याचं समजून अनेक फेसबुक यूजर्स आपपल्या मित्रांना टॅगही करत आहेत.

जळपास चार हजारपेक्षा जास्त यूजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला असून, अजून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण अद्याप हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही.