fbpx

शिवनेरी किल्ल्यावर तरुणीची आत्महत्या

टीम महाराष्ट्र देशा: शिवनेरी किल्ल्यावर पहिल्या दरवाजाच्या बाजूला सुहानी रघुनाथ खंडागळे वय वर्षे १६-१७ (अंदाजे) या मुलीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जुन्नर पोलिस तपासात ही मुलगी पिंपळगाव (सिधनाथ) येथील राहणारी असून रात्री १२ च्या सुमारास ती घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडली होती. पुढील तपास जुन्नर पोलिस स्टेशनच्या पी.एस.आय.  S.D.नवघरे करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,आज सकाळी सहाच्या सुमारास जुन्नर पोलिसांना शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्याच दरवाजाच्या बाजूला तरुणीने आत्महत्या केल्याचा फोन आला होता. त्यानुसार जुन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मयत तरुणी ही इयत्ता ९ वी मध्ये जाणार होती. रात्री कुटुंबासोबत जेवण करून ती झोपली. रात्री एकच्या सुमारास घरातून दुचाकी घेऊन ती निघाली होती. घरातील लोक तिचा शोध घेत होते. आज सकाळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली. तरुणीचे आई वडील शेती करतात. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.