fbpx

बारावीत नापास झाल्याने गळफास घेऊन मुलीची आत्महत्या !

टीम महाराष्ट्र देशा : बारावीत नापास झाल्याने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल लोणी काळभोर येथे घडली आहे. पिंकी जया शेट्टी (वय १९, मुळ गाव मॅग्लोरोना, ता. मंगळूर, जि. म्हैसूर, कर्नाटक राज्य )असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, पिंकी शेट्टी ही कर्नाटकमध्ये तिच्या गावी बारावीत शिकत होती. १४ एप्रिलला ती गावाहून कवडीपाट येथे मावशीच्या घरी आली होती. काल सकाळी तिने बारावीचा निकाल ऑनलाईन समजला. तिला आपण नापास झाल्याचे समजताच ती खूप निराश झाली आणि याच नैराश्यातून तिने बेडरूममधील पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करत आहेत.