नामग्याल नव्हे नामदेव महाराज, गिरीश बापटांनी उरकले खासदाराचे बारसे

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यात कोथरूड येथे ‘कलम ३७०’ वर लडाखचे खासदार जमयांग नामग्याल यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि जमयांग नामग्याल यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले.

‘बसचा कंडक्टर ड्रायव्हर होऊ शकतो, असिस्टंट प्रोफेसर बनू शकतो, तर खासदारचा पीए खासदार का होऊ नये? गिरीश बापट, तुम्ही तुमच्या पीएला सांभाळा,” अस वक्तव्य लडाखचे खासदार जमयांग नामग्याल यांनी केल आहे.

तर यावर गिरीश बापट यांनी आपल्या खास शैलीत जमयांग नामग्याल यांचे बारसेच उरकून टाकले. खासदार जमयांग नामग्याल यांचे नाव लक्षात राहत नाही, ते चुकायला नको. म्हणून मी त्याचे नाव नामदेव महाराज ठेवले आहे,” असे सांगत बापट यांनी त्यांचे बारसे केले. त्यास सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

महत्वाच्या बातम्या