fbpx

पक्षांतर करणारे नेते महाजनांच्या बंगल्यावरचं का जातात ?

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाताना माझा बंगला आधी येत असल्यानं पक्षात येऊ पाहणारी नेतेमंडळी आधी माझ्याकडे येत असावीत, असं म्हणत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षांतर करणारे नेते आपल्यालाचं का आधी भेटतात याचा खुलासा केला आहे. दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत गिरीश महाजन बोलत होते.

येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेत्यांनी पारंपारिक पक्षांना रामराम करत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. मात्र या पक्षांतराच्या कार्यक्रमामध्ये गिरीश महाजन अग्रेसर दिसत आहेत. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते मुख्यमंत्र्यांना भेटण्या आधी गिरीश महाजन यांच्याकडेच का बरं जात असावेत? असा प्रश्न राज्यातील अनेकांना पडला होता. त्यावर आता गिरीश महाजन यांनी मिश्कील उत्तर देत गुपित दडवून ठेवलं आहे.

सदर मुलाखतीत मुलाखतकाराने या संदर्भातला प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाताना माझा बंगला लागतो. माझा बंगला आधी येत असल्यानं ही नेतेमंडळी आधी माझ्याकडे येत असावीत. या गंमतीशीर उत्तरामुळे गिरीश महाजन यांनी प्रश्नाला उत्तमरित्या बगल दिली आहे.