गिरीश महाजनांंनची प्रतिष्ठा पणाला ; जळगाव महापालिकेच्या मतदानाला सुरुवात

टीम महाराष्ट्र देशा : जळगाव महापालिकेच्या 75 जागांसाठी 303 उमेदवार मैदानात आहेत. निवडणुकीसाठी आज सकाळी सुरुवात झाली असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान सुरु राहील. ही मतमोजणी ३ ऑगस्ट रोजी होईल. एकूण 9 पक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत.

मात्र खरा मुकाबला हा भाजपा व शिवसेनेत रंगणार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री सुरेशदादा जैन या दोघांची ही प्रतिष्ठा पणास लागली आहे. गेल्या 35 वर्षांपासून जळगाव महापालिकेवर सुरेशदादा यांची एकहाती सत्ता आहे.

निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आवश्यक मतदान यंत्रांनेसह चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.

आम्ही तर चावट विचारांचे पाईक, दिसली बाई की कर लाईक !

धुळे महानगरपालिका परिक्षेत्रात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत आयुक्तांना निवेदन

You might also like
Comments
Loading...