मुंबई : जळगाव येथील पोलीस ठाण्यात खडसेंनी तब्बल १८ तास ठिय्या आंदोलन केलं होतं. जिल्हा दूध संघात आर्थिक गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी झालीच पाहिजे, यासाठी हे आंदोलन होतं. यानंतर खडसेंचं संरक्षण माघार घेतलं. यावरुनच भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ खडसे यांच्याबाबत गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट –
एकनाथ खडे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांना असलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यावरुनच एकनाथ खडसे हे त्यांच्या सुरक्षा रक्षकांमार्फत धमकीचा फोन करायला लावायचे, असा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला आहे.
जिल्हा दूध संघात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनाथ खडसे यांनी केला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी खडसेंची मागणी होती. यासाठी ते जळगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. त्यामुळे तब्बल १८ तास खडसेंनी तिथं ठिय्या केला. अखेर जयंत पाटलांच्या सांगण्यावर हे आंदोलन थांबवण्यात आलं.
दरम्यान, गाड्यांचा ताफा, पोलिसांना मागे फिरवून आपण किती व्हीआयपी आहोत, असं खडसे दाखवायचे. आपल्याला पोलीस सुरक्षा मिळावी म्हणून खडसे त्यांच्या सुरक्षा रक्षकांमार्फत धमकीचा फोन करायला लावायचे, असं देखील महाजन म्हणाले.
आंदोलना दरम्यान, पोलीस जर तक्रारच नोंदवून घेत नसतील, तर काय करायचं?, असा सवाल यावेळी एकनाथ खडसेंनी केला आहे. चोरी झाली म्हणून तुम्ही पोलिसांकडे गेलात आणि पोलीस जर तक्रारच नोंदवून घेत नसतील, पोलीसच जर असं वागत असतील तर सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळणार?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane | ‘शेंबडा मुलगा’ उल्लेख करत नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्ला
- Prakash Ambedkar | अंधेरी पोट निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा कोणाला?, म्हणतात…
- Uddhav Thackeray | “उद्धव ठाकरेंना मशाल नाही, आईस्क्रीमचा कोन दिलाय”, नितेश राणेंच्या वक्तव्यावर सेनेचा पलटवार
- T20 World Cup । T20 विश्वचषकापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली चांगल्या फॉममध्ये, प्रॅक्टिस मॅचमधील व्हिडीओ व्हायरल
- T20 World Cup । टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार यादवशी सुरु असलेल्या कंपटीशनवर बाबर आझमची मोठी प्रतिक्रिया