ना भेगडे ना जगताप… गिरीश महाजन होणार पुण्याचे पालकमंत्री ?

Not water sharing with Gujrat-Mahajan

टीम महाराष्ट्र देशा : पुणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट पुणे मतदारसंघाचे खासदार झाल्याने रिक्त झालेले पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता लागली आहे. पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि पुणे जिल्हाध्यक्ष आणि मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

मात्र, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट खासदार झाल्यामुळे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची अतिरिक्त जबाबदारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देण्याबाबत पक्षश्रेष्ठींमध्ये खलबत सुरू आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात भाजपअंर्तंगत असलेल्या प्रचंड स्पर्धेमुळे पालकमंत्रिपद वरिष्ठ मंत्र्याकडे सोपविण्याचा विचार पुढे आला आहे. त्यामुळे आगामी मंत्री मंडळांच्या विस्तारात पुण्यातील आमदारांचा नंबर लागण्याची शक्यताही धुसर समजण्यात येत आहे. महाजन यांच्याकडे पुढील तीन महिन्यांसाठी पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त पदभार राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ना भेगडे ना जगताप गिरीश महाजन होणार पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झालं आहे.

Loading...

दरम्यान, जून महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये आमदार जगताप किंवा भेगडे या दोघांपैकी एकाची कॅबिनेट अथवा राज्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाकडे पालकमंत्रीपद येऊ शकते असं बोललं जात होत. ऐनवेळी दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांना देखील पालकमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण, कुल यांच्या पत्नी कांचन यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचे धाडस पेलत त्यांना कडवे आव्हान दिले होते.

तर, आगामी विधानसभेची आचारसंहिता सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांना अतिरिक्त पदभार स्वीकारण्याच्या सूचनाही दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत