मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजप पक्षात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाशिक येथील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या कानात एकनाथ खडसेंनी म्हटलेल्या गोष्टीचा महाजनांनी खुलासा केला होता. हा दावा एकनाथ खडसेंनी फेटाळताच महाजनांनी पुरावे देण्याचा इशारा दिला आहे.
एकनाथ खडसे यांना इशारा :
एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस आणि माझ्या कानात काय सांगितलं याची क्लिप आहे माझ्याकडे, त्याचं रेकाॅर्डिंग ही उपलब्ध आहे, अधिक बोलायला लावू नका, असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे.
गिरीश महाजन यांचा इशारा :
नाशिक येथील कार्यक्रमात एकनाथ खडसे मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येऊन भेटले. यावेळी फडणवीसांच्या कानात भेटुन मिटून टाकू, असं खडसे म्हणाले असल्याचा गौप्यस्फोट महाजानांनी केला आहे.
सर्वप्रकारे तर त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडीची चौकशी सुरू आहे. सीबीआय चौकशी सुरू आहे. या सर्व चौकशींना मी समर्थपणे सामोरं जाणार आहे, त्यामुळे मिटवण्यासारखं काही राहिलेलं नाही, मी असं काहीच बोललो नाही, असं खडसेंनी उत्तर दिलं होतं.
यादरम्यान, काही दिवसांपुर्वी एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेल होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सून रक्षा खडसे देखील होत्या. यावेळी महाजनांना माहिती मिळताच त्यांनी रक्षा खडसे यांना फोन करुन माहिती घेतली असल्याचं महाजन म्हणाले.
अमित शहा यांच्या ऑफिस बाहेर आम्ही तीन तास थांबलो मात्र, शहांनी भेट नाकारली असल्याचं रक्षा खडसे यांनी महाजान यांना सांगितलं असल्याचा खुलासा गिरीश महाजन यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jio Update | 5G नेटवर्क फोन नंतर Jio आता लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत
- Sharad Pawar | दसरा मेळाव्याच्या वादावरुन शरद पवारांनी एकनाथ शिंदेंसह उद्धव ठाकरेंना देखील सुनावलं, म्हणाले…
- Chandrashekhar Bawankule । अजितदादांनी सत्तेत येण्याचं स्वप्न बघू नये ; चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला
- Viral Video | फुग्यासोबत खेळणाऱ्या या दोन क्युट मांजरी, पाहा व्हिडिओ!
- Eye Care Tips | नजर कमी होतेय? तर करा हे घरगुती उपाय