fbpx

सिंचन घोटाळ्यातील बडे मासे लवकरच गळाला लागतील – महाजन

girish mahajan

पंढरपूर : सिंचन घोटाळ्यामध्ये तपास यंत्रणाकडून रोज चौकशी केली जात आहे, दोन दिवसांपूर्वीच एसीबीकडून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच घोटाळ्यातील बडे मासे देखील गळाला लागतील. असं विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या संघटनांच्या विरोधामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थित आज विठ्ठलाची  शासकीय पूजा करण्यात आली आहे. यावेळी गिरीश महाजन बोलत होते.

ज्यांनी ज्यांनी चुका केल्या आहेत, भ्रष्ट्राचार केला आहे ते सर्व पुढे येवूदे, असं साकड आपण पांडुरंगाला घातल्याचही महाजन यांनी सांगितले.

जाधव दाम्पत्याला विठू माऊलीच्या शासकीय पूजेचा मान 

मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर सपत्नीक पूजा