Share

Girish Mahajan | अमित शहांनी ३ तास एकनाथ खडसेंना ऑफिसबाहेर थांबवलं अन् भेटही नाकारली – गिरीश महाजनांनी केला खुलासा

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजप पक्षात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अमित शहा यांना भेटण्यास गेलेल्या एकनाथ खडसेंसोबत नक्की तिथं काय झालं हे महाजन यांनी सांगितलं आहे.

गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट :

काही दिवसांपुर्वी एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेल होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सून रक्षा खडसे देखील होत्या. यावेळी महाजनांना माहिती मिळताच त्यांनी रक्षा खडसे यांना फोन करुन माहिती घेतली असल्याचं महाजन म्हणाले.

रक्षा खडस यांनी सांगितलं सत्य :

यादम्यान, अमित शहा यांच्या ऑफिस बाहेर आम्ही तीन तास थांबलो मात्र, शहांनी भेट नाकारली असल्याचं रक्षा खडसे यांनी महाजान यांना सांगितलं असल्याचा खुलासा गिरीश महाजन यांनी केला आहे.

दरम्यान, अमित शहा आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती खडसेंनी दिली होती. या सर्व प्रकरानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यावर आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्टीकरण खडसेंनी दिलं आहे. एवढंच नाही तर या भेटी बाबतची माहिती खडसेंनी शरद पवार यांना दिली होती, असं देखील खडसेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजप पक्षात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच भाजप नेते गिरीश …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now