fbpx

मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहात का ? गिरीश महाजन म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेने जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीही जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळे दौरे काढत आहे.

याच दरम्यान भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी भाष्य केले आहे. एएम न्यूजशी बोलताना त्यांना मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहात का असा प्रश्न विचारला असता महाजन यांनी मी या रेसमध्ये अजिबात नाही. कुठेच नाही. पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारतोय. प्रामाणिकपणे काम करतोय. आमच्यात टीमवर्क आहे. आम्ही चांगले मित्र आहोत. फक्त मी आणि मुख्यमंत्रीच नाही तर आम्ही सर्वच चांगले मित्र नाही. इतर पक्षांतील नेत्यांप्रमाणे आमच्या चढाओढ नाही असं विधान केले आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच्या मैत्रीविषयी बोलताना ‘आमची मैत्री जुनी आहे. सुरुवातीपासून आम्ही सोबत आहोत. देवेंद्र फडणवीसांचा संपूर्ण प्रवास मी पाहिला आहे. त्यांच्यात काय बदल झाला याविषयी बोलताना ते म्हणाले की, सुरुवाती पासून आम्ही सोबत आहोत. त्यांची अभ्यासू वृत्ती तशीच आहे. त्यांचं भाषण आचरण, बोलणे अजूनही तसेच आहे. आमच्यात कुठेही स्पर्धा, द्वेष चढाओठ नाही’ असं विधान केले आहे.

दरम्यान भाजप आणि आणि शिवसेना वारंवार आपणचं पुन्हा सत्ता स्थापन करू असा दावा करत आहेत. तसेच मुख्यमंत्री पदावर दावा करत आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार असल्याचं बोललं जात आहे तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा दावेदार आहेत.

महत्वाच्या बातम्या