शिवसेनेला जनताच जागा दाखवेल, गिरीश महाजन शिवसेनेवर बरसले

girish mahajan

पालघर – शिवसेनेने राजकीय खेळी करून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांचे पक्षांतर करून घेतले. त्यामुळे शिवसेनेला पालघरची जनताच त्यांची जागा दाखवेल,अश्या शब्दात  राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर आगपाखड केली आहे. पालघरमध्ये झालेल्या विविध पक्ष कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवासन वनगा यांनी ही निवडणूक शिवसेनेकडून लढण्याचा निर्णय घेतल्याने पालघर पोटनिवडणुक चर्चेचा विषय ठरली आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँगेसकडून तब्बल पाच वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या दामू शिंगडा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपने कॉंग्रेसमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांच्या नावाची घोषणा केलीये.