fbpx

गिरीश महाजन उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर केली दिलगिरी व्यक्त

टीम महाराष्ट्र देशा : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री पदावरून केलेल्या वक्तव्यावरून महाजन यांनी उद्धव ठाकरे यांचासमोर दिलगिरी व्यक्त केल्याचे समोर आले आहे.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सेना भाजपात मुख्यमंत्री पदावरून विविध चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे वक्तव्य केले होते. दरम्यान महाजन यांनी त्यांच्या त्या वक्तव्या संदर्भात दिलगिरी व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला, माझ्या वक्तव्य संदर्भात मी उद्धव ठाकरे यांच्या समोर दिलगिरी व्यक्त केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी मला माफ केले असून, पुन्हा असे विधान करू नका ते युतीसाठी घातक आहे असे म्हंटले. याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा केली, असेही ते म्हणाले.