जळगावात गिरीश महाजनांचा शिवसेनेला धक्का; 13 नगरसेवकांची घरवापसी

जळगाव : जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षातून फुटून गेलेल्या 29 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. मात्र, त्यातील 13नगरसेवकांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला असून भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी पुन्हा शिवसेनेला धक्का दिला आहे.जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे तब्बल ५७ नगरसेवक निवडून आले होते.

गेल्या चार महिन्यापूर्वी महापौर निवडणुकीवेळी भाजपचे तब्बल 29 नगरसेवक फुटले आणि त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे जळगावात सत्तांतर होऊन शिवसेनेचा महापौर विराजमान झाला होता. तर बंडखोर भाजप गटाला उपमहापौरपद देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाने फुटलेल्या नगरसेवकांना बडतर्फे करावे यासाठी विभागीय आयुक्ताकडे याचिका दाखल केली आहे, त्यावर सुनावणी सुरू आहे.

भाजपमधून फुटलेल्या २९ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवक आज पुन्हा भारतीय जनता पक्षात स्वगृही परतले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन यांना यांच्या जळगाव येथील जी.एम.फाउंडेशन या संपर्क कार्यालयात या नगरसेवकांचा सत्कार जिल्हा अध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या