सेल्फी वादावर गिरीश महाजनांनी दिले स्पष्टीकरण म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

या परिस्थितीची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पाहणी करत होते. महाजन हे बोटीत स्वार होऊन कोल्हापूर सांगलीच्या भागामध्ये फिरत होते, यावेळी महाजन यांच्या समवेत बोटीमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने सेल्फीसाठी मोबाईल उंचावला, तर महाजन हे हसत सेल्फी देत होते. गिरीश महाजन यांच्या सेल्फीचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामुळे राज्यातील मंत्री किती असंवेदनशील बनले आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आता यावर गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

या सर्व प्रकरणावरून खुद्द गिरीश महाज यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी अनेक लोक माझ्यासोबत सेल्फी काढतात. मी त्यांना नकार देऊ शकत नाही. सध्या संकटाची स्थिती आहे, लोकांना प्रचंड त्रास होत आहे. मात्र, विरोधकांना फक्त या सगळ्याचे राजकारण करायचे आहे. अशा शब्दात त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला पत्युत्तर दिले.

दरम्यान, ही पूरस्थिती नियंत्रित करण्यास सरकारला अपयश आल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा अशीही मागणी होत आहे. सरकारकडून मात्र पूरग्रस्तांना शक्य ती मदत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच काही सामाजिक संस्थाही पूरग्रस्तांसाठी धावून आल्या आहेत.

महापूर सेल्फीनंतर महाजनांनी पाण्यात उतरून घेतला आढावा

जुने सरकार ७ दिवस घर पाण्यात गेले तरचं मदत द्यायचं : आशिष शेलार

‘राज ठाकरेंचे ‘ते’ विधान दखल घेण्यायोग्य नाही’

असंवेदनशील गिरीश महाजनांचा तात्काळ राजीनामा घ्या – धनंजय मुंडे