दारूला महिलेच नाव दिल्यास विक्री वाढते; गिरीश महाजन यांचा अजब सल्ला

girish mahajan

टीम महाराष्ट्र देशा: दारूची विक्री वाढण्यासाठी त्याला महिलांचे नाव दिल्यास त्याची विक्री निश्चित वाढेल असा अजब सल्ला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या दारूचे नाव बदलून ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’ ठेवण्याचा अजब सल्ला महाजन यांनी भर सभेत दिला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामास आज प्रारंभ झाला, त्या कार्यक्रमात महाजन बोलत होते.

Loading...

काय म्हणाले गिरीश महाजन

राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री कोपरगावचे नेते शंकरराव काळे यांच्या कारखान्याची होते. त्यांच्या कारखानानिर्मित दारूचे नाव ‘भिंगरी’ आहे. तर माजी आमदार कोल्हे यांच्या कारखान्यातर्फे निर्माण होणाऱ्या मद्याचे नाव ‘ज्यूली’ आहे. त्याचप्रमाणे बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते. ही वस्तुस्थिती आहे. मद्य व तंबाखूजन्य पदार्थांना असलेली नावे बहुतांशी महिलांची आहेत. जसे विमल, केसर गुटखा हे माव्याचे प्रकार बंदी असताना विकले जातात. त्यामुळे सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी ‘महाराजा’ऐवजी ‘महाराणी’ करावे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...