fbpx

राज्य दुष्काळाच्या खाईत,जलसंपदा मंत्री गरबा खेळण्यात दंग

डोंबिवली : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा टीकेचे धनी बनले आहेत. राज्य दुष्काळात होरपळत असताना जलसंपदा मंत्री मात्र गरबा खेळण्यात दंग असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाजन यांचा गरबा खेळतानाचा व्हिडियो व्हायरल झाला असून सोशल मिडीयावर महाजन यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.

महाजन हे गुरुवारी एका कार्यक्रमासाठी डोंबिवलीत आले होते. तिथून त्यांनी एका दांडियाच्या कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी तिथलं वातावरण पाहून गिरीश महाजन यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. त्यांच्यासोबत असलेले आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार कुमार आयलानी यांनीही त्यांना साथ दिली.

एकनाथ खडसेंची महाराष्ट्राला गरज- गिरीश महाजन

3 Comments

Click here to post a comment