मुंबई: राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat elections)भाजपने सर्वाधिक जागांवर यश मिळविले. शिवसेना चौथ्या स्थानावर असून राष्ट्रवादी पक्षाने दुसरा क्रमांक मिळविला. तर काँग्रेसला तिसरे पक्ष स्थान मिळवण्यात यश आले. दरम्यान बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेने बाजी मारली असून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान एकनाथ खडसे यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की,’एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. पण शेवटी पराभव तर पराभवच आहे. भाजपा आणि शिवसेनेची छुपी युती( BJP Shiv Sena alliance) होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पेपरमध्ये फोटोही आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा पराभव करा या हेतूने सर्व पक्ष एकत्र आले’ आता यावरच भाजप नेते गिरीश महाजन (BJP leader Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“बोदवड नगरपंचायतीसंबंधी (Bodwad Nagar Panchayat) एकनाथ खडसे यांना काय म्हणायचे आहे ते म्हणू द्या. विधानसभेत खडसे पडले; खरं तर ते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत होते. बोदवडमध्ये हारले तर आता कारणं कशाला सांगत आहात. मोठ्या मनाने सांगाना आम्ही हरलो. ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही, त्यामुळे काही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजवायची असा प्रकार खडसे करत आहे.” असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. दरम्यान निवडणुकीअगोदर शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांची भेट चर्चेचा विषय ठरली होती.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबईत टिपू सुलतानच्या नावाने भाजपचा राडा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- विराटचे यश कोणाला पचले नाही? हरभजनचा रवी शास्त्रींना सवाल
- अभिनेता चिरंजीवीला कोरोनाची लागण
- प्रसिद्ध तबलावादक अनिंदो चटर्जी यांचाही पद्मश्रीस नकार; म्हणाले, हा पुरस्कार आधीच…
- ‘या’ बडया सेलिब्रिटींनी रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या ‘पुष्पा’ला नाकारले